तरुण महाराष्ट्र करतो ‘स्वच्छता मतदान’

29 Sep 2017

या उपक्रमाचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग तसेच शालेय शिक्षण विभाग यांनी केले. १,५६२ शाळांतील सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी सकाळी ११ ते २ दरम्यान स्वच्छता मतदानाचा आपला हक्क बजावला. विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक आणि अधिकारीही उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले. विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे मतदान पत्रिका तयार करण्यात आल्या.

मतदानासाठी विद्यार्थ्यांनी सकाळपासून रांगा लावल्या. पहिल्यांदाच मतदान करीत असल्याचा उत्साह व उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होती. मत देण्यापूर्वी बोटावर शाई लावली जात होती. विद्यार्थ्यांना याचे फार अप्रुप वाटत होते. विद्यार्थी एकमेकांना ही खुण खूप उत्साहाने दाखवित होते. चित्ररूपी व रंगीत मतपत्रिका मुलांना न आवडत्या तरच नवल! मतदान करण्याच्या प्रक्रीयेमध्येच विद्यार्थ्यांचे स्वच्छताविषयक शिक्षण होत होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा स्वच्छता विषयक जाणीवजागृती मधील सहभाग अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. जिल्ह्यात एकाच वेळी ८० हजार बालमतदारांनी स्वच्छतेसाठी नोंदविलेले मत भविष्यातील स्वच्छ सुंदर भारताची नांदी ठरले आहे.

दीपेंद्र लोखंडे
शिक्षण अधिकारी ( प्राथमिक )
जिल्हा परिषद नागपूर

अपनी टिप्पणियां दें

कुल टिप्पणियां - 0

Leave a Reply